नोकरी करण्‍याचे विचार आल्‍यावर त्‍यावर  स्‍वयंसूचना घेऊन त्‍यातून बाहेर पडता येणे

श्री. अभिजीत विभूते

मधल्‍या काळामध्‍ये माझ्‍या मनात ‘नोकरी करूया’, असे विचार तीव्रतेने वाढले होते. त्‍या वेळी मी इतरांचे साहाय्‍य घेऊन त्‍यावर स्‍वयंसूचना घेतल्‍या. मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेमुळे त्‍या प्रसंगाशी लढता आले. पूर्वी मी नोकरीत ७ – ८ वर्षे वाया घालवली आणि इकडे आश्रमात आलो. आता इथून परत जायला नको. मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रेमाने बांधून ठेवले आहे. त्यामुळे मला कितीही चांगली नोकरी मिळाली, तरी मी इथून जाऊ शकत नाही. हे केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्‍या प्रीतीमुळे शक्य झाले आहे. आता मला पैसे कमवण्यापेक्षा जीवनात साधनेचे महत्त्व समजले आहे. मला बाहेरचे जग हे नरक आणि आपला आश्रम हा वैकुंठ वाटतो. ‘आम्हाला हलसिद्धनाथ आणि तुम्ही बांधून ठेवले आहे’, असे मला जाणवते.’

– श्री. अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.४.२०२३)