US Defense Budget Decreased : अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पामध्ये होणार कपात !

राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा निर्णय

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी आता अमेरिकेच्या वरिष्ठ सैन्याधिकार्‍यांना संरक्षण अर्थसंकल्पामध्ये कपात करण्याची योजना आखण्यास सांगितले आहे. यामुळे अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पामध्ये वार्षिक ८ टक्के कपात होऊ शकते.

याने पुढील ५ वर्षांची एकूण कपात पहाता ती २९० अब्ज डॉलर (साधारण २५ लाख कोटी रुपये) होण्याची शक्यता आहे.

१. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनला मोठ्या प्रमाणात कपात करण्यास सांगितले आहे. सध्या अमेरिकेचा संरक्षण अर्थसंकल्प हा ८५० अब्ज डॉलर (साधारण ७३ लाख कोटी रुपये) इतका आहे. ही कपात पूर्णपणे कार्यान्वित केली गेली, तर ५ वर्षांनी हा आकडा प्रतिवर्षी अल्प होत जाऊन अनुमाने ५६० अब्ज डॉलर (साधारण ४८ लाख कोटी रुपये) होईल.

२. गेल्या आठवड्यात इलॉन मस्क यांच्या सरकारी कार्यक्षमता विभागाने पेंटागॉनला भेट दिल्यानंतर हा अहवाल आला आहे. याविषयी त्यांच्यावर सैन्य आणि काँग्रेस या दोघांकडूनही तीव्र टीका होत आहे.