Aakash Chopra On ‘Chhaava’ Movie : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का शिकवला नाही ?

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक असणारे आकाश चोप्रा यांचा ‘छावा’ चित्रपटावरून प्रश्न

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा

मुंबई –  मी ‘छावा’ चित्रपट पाहिला. शौर्य आणि अतुलनीय पराक्रम, देशाप्रती कर्तव्य दाखवतांना ज्या निःस्वार्थी वृत्तीचे दर्शन झाले, त्यावरून मला काही प्रश्न पडले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का नाही शिकवला गेला ?, असा प्रश्न प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू आणि समालोचक असणारे आकाश चोप्रा यांनी एक्स वर पोस्ट करत विचारला आहे.

आम्हाला ‘अकबर कसा मोठा’ हे शिकवले !

आकाश चोप्रा यांनी पुढे लिहिले की, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तर नाहीच नाही; पण त्यांचा साधा उल्लेखही कुठे नाही. आपल्याला अकबर कसा मोठा आणि न्यायप्रिय राजा होता, हे शिकवले गेले. तर राजधानी देहलीत एका रस्त्याचे नाव औरंगजेब आहे. हे सर्व का आणि कसे घडले?

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या काळात मोगलांचा उदोउदो करण्यात आला आणि तोच देशातील विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला, तर भारतीय हिंदु राजे आणि त्यांचा इतिहास दडपण्यात आला. त्यामुळेच आज ‘छावा’ चित्रपटातून तो दाखवण्यात येत असल्याने देश आणि विदेश येथील लोकांना तो समजत आहे !