Attack On Hindus In Bihar : हनुमान चालीसा पठण करून परतणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

  • जमुई (बिहार) येथील घटना

  • १० जण घायाळ

  • आक्रमण करण्यामध्ये मुसलमान महिला आणि मुले यांचाही समावेश

  • हलगर्जीपणा करणारे पोलीस निलंबित

घायाळ हिंदू (डावीकडे) घटनास्थळी उपस्थित पोलीस (उजवीकडे)

जमुई (बिहार) – येथे हनुमान चालीसा पठण करून परतणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी मुसलमानबहुल भागातील मशिदीजवळ दगडफेक करत आक्रमण केले. तसेच अनेक वाहनांची तोडफोड केली. यात महिलांसह १० हिंदु कार्यकर्ते घायाळ झाले. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला असून शहरातील इंटरनेट व्यवस्था बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आक्रमणाच्या प्रकरणी काही लोकांना अटकही केली आहे.

१. हिंदू स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते १६ फेब्रुवारीला जमुईच्या बलियाडीह गावात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी गेले होते. पठण करून परतत असतांना मशिदीजवळ त्यांच्या वाहनांवर ३०० ते ४०० धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले.

२. धर्माध मुसलमानांच्या जमावाने हिंदु कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या खिडक्या फोडल्या. कार्यकर्त्यांवर विटा आणि दगड फेकले. या आक्रमणात हिंदू स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीश कुमार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या खुशबू पांडे यांच्यासह सुमारे १० कार्यकर्ते घायाळ झाले.

३. ‘न्यूज १८ बिहार’च्या वृत्तानुसार आक्रमण करण्यामध्ये मुसलमान महिला आणि मुले हेसुद्धा सहभागी झाले होते.

४. घायाळ झालेल्या खुशबू पांडे म्हणाल्या की, बलियाडीह गावातील भालेश्‍वर नाथ मंदिरात हनुमान चालीसा कार्यक्रम होता. प्रसाद घेतल्यानंतर परतत असतांना मशिदीपासून थोड्या अंतरावर अचानक दगडफेक चालू झाली. गाडीची तोडफोड करण्यात आली. तिथे ‘अल्लाहू अकबर’च्या (अल्ला महान असल्याच्या) घोषणा दिल्या जात होत्या. मला शोधून मारण्याची योजना होती. तसेच पोलिसांवर आक्रमण करण्याचाही कट होता; मात्र देवाच्या कृपेने मी वाचले.

५. पोलिसांकडून हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर जमुईचे पोलीस अधीक्षक मदन कुमार आनंद यांनी सांगितले की, हनुमान चालीसा पठण करून परतणार्‍या लोकांविरुद्ध घोषणाबाजी केल्यानंतर तेथे उपस्थित पोलीस पथकाने वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवले नाही. त्यांनी स्वतःच प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला आणि मार्ग पालटण्याविषयीही बोलले. आम्ही संबंधित पोलिसांकडून स्पष्टीकरण मागितले आहे आणि त्यांना निलंबितही केले आहे.

६. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये ८ जणांचा समावेश असून ५० जणांना अनोळखी आरोपी बनवण्यात आले आहे. कारवाई करतांना पोलिसांनी ९ गुन्हेगारांनाही अटक केली आहे. गावात शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक यात्रांवर मशिदीजवळ आक्रमणे केली जातात, हे काही नवीन राहिलेले नाही. आता अशा ठिकाणी जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत !
  • बिहारमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कुणी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे का ? याचा शोधही घेतला पाहिजे !