Chaos At Delhi Metro’s Jama Masjid Station : देहलीच्या जामा मशीद मेट्रो स्थानकावर ‘शब-ए-बारात’च्या रात्री धुडगूस !

मेट्रो प्रशासनाकडून मुसलमानांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न !

(शब-ए-बारात हा मुसलमानांचा एक महत्त्वाचा सण असून त्या दिवशी ते अल्लाचा आशीर्वाद मागण्यासह त्यांनी केलेल्या कुकृत्यांसाठी क्षमा मागत असतात.)

नवी देहली – देहली मेट्रोचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला असून त्यामध्ये अनेक मुसलमान येथील जामा मशीद मेट्रो स्थानकावर धुडगूस घालत असल्याचे दिसत आहे. हे लोक स्थानकाच्या ‘एक्झिट गेट’मधून उड्या मारतांना दिसत आहेत. मुसलमानांच्या या कृत्यावर टीका झाल्यानंतर ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’कडून यासंदर्भात वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे की, व्हिडिओत दाखवलेली घटना ‘शब-ए-बारात’च्या रात्री (१३ फेब्रुवारीच्या रात्री) साडेअकरा वाजण्याच्या जवळपास घडली. सणामुळे स्थानकावरील गर्दी वाढली होती. त्यामुळे ‘एक्झिट गेट’वर मोठी गर्दी जमली.

प्रशासन पुढे म्हणते की, ही घटना काही मिनिटेच चालली आणि लवकरच स्थानकावर परिस्थिती पूर्ववत् झाली. तेथे पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते अन् परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर गेली नाही. (काही मिनिटे गोंधळ घालण्याच्या बेशिस्त वर्तनामुळे तेथील सामान्य प्रवाशांना त्रास झाला, त्याचे काय ? मुळात प्रशासनाविषयी मुसलमानांना भयच राहिले नसल्याचे या घटनेतून लक्षात येते. याविषयी प्रशासन काहीच का बोलत नाही ? – संपादक)