Mahakumbh 2025 : महाकुंभक्षेत्रातील ७० टक्क्यांहून अधिक शिबिरांचे प्रयाण !

स्नानासाठी मात्र भाविकांची अफाट गर्दी !

प्रयागराज, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभक्षेत्रातून नागा साधू, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांच्या ७० टक्क्यांहून अधिक शिबिरांनी प्रयाण केले आहे. त्यामुळे कुंभक्षेत्रातील भाविकांची गर्दी ओसरली आहे. गर्दी ओसरली असली, तरी उत्तरप्रदेशमधील स्थानिक भाविक मोठ्या प्रमाणात स्नानासाठी येत आहेत. हे भाविक कुंभक्षेत्रात येण्याऐवजी थेट त्रिवेणी संगमावर स्नानासाठी जात आहेत.

बहुतांश भाविक स्थानिक असल्यामुळे त्यांना कुंभक्षेत्राचा परिचय आहे. त्यामुळे गंगा घाटावर जाण्याऐवजी जेथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम आहे, त्या त्रिवेणी घाटावर हे भाविक स्नानासाठी जात आहेत. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे.