US Deported Illegal Indians : बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना घेऊन अमेरिकी सैन्याचे विमान भारताकडे मार्गस्थ !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेत बेकायदा रहणार्‍या स्थलांतरितांना बाहेर काढले जात आहे. या भारतियांचाही समावेश आहे. अशा भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकेचे सैनिकी विमान भारताकडे मार्गस्थ झाले आहे. या विमानात किती जण आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, कुठलेही कागदपत्रे नसलेल्या आणि अमेरिकेत रहात असलेल्या भारतियांना भारतात वैध मार्गाने परत आणण्यासाठी भारताचे दरवाजे कायमच उघडे आहेत.

संपादकीय भूमिका

भारतातून अशा प्रकारची विमाने बांगलादेश आणि म्यानमार येथे कधी मार्गस्थ होणार ? हा प्रश्‍न आहे. ट्रम्प यांनी आदेश दिल्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दिवसांत अमेरिकेने प्रत्यक्ष कृती केली; मात्र भारतात गेली काही दशके जनता बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची मागणी करत असतांनाही सरकार कठोर प्रयत्न करत नाही, हेही तितकेच खरे !