Peter Hurkos Predictions : भारतात मूळ सनातन धर्माचा शंखनाद होईल आणि अध्यात्मामुळे तो विश्‍वगुरु होईल !

मागील शतकातील हॉलंडमधील भविष्यवेत्ते पीटर हर्कोस यांनी करून ठेवलेली भविष्यवाणी !

भविष्यवेत्ते पीटर हर्कोस

नवी देहली – हॉलंडमध्ये गेल्या शतकात होऊन गेलेले सुप्रसिद्ध भविष्यवेत्ते पीटर हर्कोस यांनी अनेक भाकिते वर्तवली होती आणि त्यातील अनेक भाकिते सत्यही ठरली आहेत. त्यांनी भारताविषयीही भाकिते केली होती. ही भाकिते खरीही ठरली आहेत. त्यांनी आणखी एक भाकीत केले आहे. त्यांनी सांगून ठेवले आहे की, भारतात मूळ सनातन धर्माचा शंखनाद होईल. भारत अध्यात्म आणि शांतता यांमुळे विश्‍वगुरु होईल.

भारताबद्दल हर्कोस यांनी केलेल्या अन्य भविष्यवाण्या

१. भारतातून आध्यत्मिकतेची लाट उसळेल आणि ती सर्व जगात पसरेल.

२. भारत संपूर्ण विश्‍वाचे प्रतिनिधित्व करेल. भारत जगाचे मार्गदर्शन करेल.

३. आध्यात्मिक वातावरणामुळे भारतात आतंकवाद्यांचा बीमोड होण्यास साहाय्य होईल.

पीटर हर्कोस यांचा परिचय

पीटर हर्कोस यांचा जन्म २१ मे १९११ या दिवशी हॉलंडमधील ड्रोड्रेक्ट येथे झाला होता. तरुणपणी नौकेवर स्वयंपाकी म्हणून ते काम करत होते. एके दिवशी ते ५० फूट उंचीवरून पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ते ६ दिवस ‘कोमा’मध्ये होते. या अपघातामुळे त्यांच्यात अतींद्रिय ज्ञानाची क्षमता विकसित झाली. ते व्यक्तीचा भूतकाळ सांगू लागले आणि भविष्यातील काही घटनाही त्यांनी सांगितल्या. हर्कोस यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात पोलिसांना साहाय्य केले. त्यांनी स्वतःच्या जीवनावर ‘द सायकिक वर्ल्ड ऑफ पीटर हर्कोस’ हे पुस्तक लिहिले. १ जून १९८८ या दिवशी अमेरिकेतील वेस्ट हॉलीवूड, कॅलिफोर्निया येथे हर्कोस यांचे निधन झाले.

संपादकीय भूमिका

पीटर हर्कोस यांचे भाग्य की, ते आज नाहीत. अन्यथा काँग्रेसी आणि पुरो(अधो)गामी कंपू याने त्यांना ‘कट्टर हिंदुत्ववादी’, ‘भगवा आतंकवादी’, ‘अंधभक्त’ अशा नानाप्रकारे हिणवून सोडले असते, हेच खरे !