बलात्कारपीडित तरुणीने मुंबई पोलिसांची दिशाभूल केली !

आरोपीने नव्हे, तर तरुणीनेच स्वतःच्या गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड टाकले

प्रतिकात्मक चित्र

 मुंबई – गोरेगाव येथे बलात्कारपीडित तरुणीच्या गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडले होते. चौकशी केली असता तिने बनाव रचून पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले. तिने अनाथ असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात तिचे आई-वडील नालासोपारा येथे रहातात. वडिलांशी भांडण झाल्याने तरुणी घराबाहेर पडली. रिक्शाचालकाशी भेट झाल्यावर तिने आत्महत्येचे विचार त्याला सांगितले. त्याने अपलाभ घेत तिच्यावर अत्याचार केला. हे कृत्य समजल्यावर आई-वडील मारतील, या भीतीने तिने गुप्तांगात वरील साहित्य घातल्याचे तिने मान्य केले.

संपादकीय भूमिका :

पोलिसांची दिशाभूल होणे हे पोलीस प्रशासनासाठी दुर्दैवी !