
पुणे – सायबर गुन्हे करणार्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघा संशयितांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. नेपाळच्या २, तर तमिळनाडूतील १ अशा एकूण ३ आरोपींना पोलिसांनी पकडले. या टोळीने ६८ लाख रुपयांच्या गैरव्यवहारासह ५० खात्यांवरून १३ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अन्वेषणाला प्रारंभ केला. लाचीन शेर्पा, बिन बहादूर प्रधान आणि रमेश कुमार अभिमन्यू अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांना ७ भ्रमणभाष संच, बँकांचे पासबुक, धनादेश पुस्तक यांसह पारपत्र मिळाले आहे. या आरोपींनी मुंबई, पुणे, बेंगळूरू येथे अनेकांना फसवले आहे.