१. ‘इस्लामी संस्कृती, ख्रिस्ती संस्कृती, समाजवादी, साम्यवादी संस्कृती, नेहरूप्रणालीची ‘सेक्युलर’ (निधर्मी) संस्कृती, दलित संस्कृती, साडेतीन टक्क्यांची संस्कृती, साहित्य संस्कृती असा सगळा हा तमाशा आहे आणि संस्कृतीच्या नावाखाली विलक्षण जनसंहार होत आहे. आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि अन्य संस्कृतीचा नाश करण्याकरता सर्वच टपलेले आहेत. ग्रंथ, वृत्तपत्रे, तसेच प्रसारमाध्यमे यांतून संस्कृतीची चर्चा अखंड चालू आहे. हिंदूंची सनातन संस्कृती, हीच खरी संस्कृती आणि तीच सर्वोच्च संस्कृती !
२. लोकसभा आधुनिकांची विलासी आणि विलासाचे जीवन हीच संस्कृती आहे. आरडाओरडा, तावातावाने बोलणे, सभापतींचा आज्ञाभंग करणे, एकाच वेळी दोन-चार व्यक्तींनी एकदम बोलणे, तसेच सभापतींच्या समोरच्या जागेत फतकल मांडून बसणे. मग सभापतींनी सभा तहकूब (स्थगित) करणे. घोषणा देत सभात्याग, अशी ही कायदेमंडळीची संस्कृती आहे.
३. लोकसभा अस्तित्वात येते, ती जाती-जमातीचे झगडे पदरात बांधून. राजकीय अस्पृश्यतेची ‘राजनीती’ हीच लोकशाहीची संस्कृती. लोकशाहीचे पराकोटीच्या ‘विरोधशाहीत’ रूपांतर हीच संस्कृती.
४. A politician is a stateman who places nation at his service. (अर्थ : राजकारणी हा एक शासनकर्ता असतो, जो देशाला त्याच्या सेवेत ठेवतो.) ‘राज्य ही आपल्या बापजाद्याची संपत्ती आहे, असे समजून वागणे ही संस्कृती.’
(साभार : साप्ताहिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२४)