पत्राचा आता ४ कोटी ३२ लाख रुपयांना लिलाव !
वॉशिंग्टन – ‘ॲपल’चे जगप्रसिद्ध आस्थापनाचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी वर्ष १९७४ मध्ये, म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचा बालपणीचा मित्र टीम ब्राउन याला लिहिलेल्या पत्राचा अनुमाने ४ कोटी ३२ लाख रुपयांना लिलाव झाला. या पत्रात जॉब्स यांनी भारतातील कुंभमेळ्यात जाण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली होती.
Steve Jobs wanted to visit the Kumbh Mela at 19 – Revealed in his letter to childhood friend Tim Brown
The letter has been auctioned for a staggering ₹4.32 crore!#MahaKumbh2025 pic.twitter.com/ScbZq5ufko
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 16, 2025
जॉब्स यांनी हे पत्र त्यांच्या वाढदिवसाच्या काही दिवस अगोदर लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘मला एप्रिलमध्ये चालू होणार्या कुंभमेळ्यासाठी भारतात जायचे आहे. मी मार्चमध्ये कधीतरी निघणार आहे, अजून निश्चित नाही.’ जॉब्स हे १९७० च्या दशकात भारतात आले होते. त्या वेळी त्यांनी भारतात विविध ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. वर्ष २०११ मध्ये अमेरिकेत त्यांचे निधन झाले.