नवी देहली – प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयात एका अधिवक्त्याकडून जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. यात उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणाचा स्थिती अहवाल मागवावा आणि उत्तरदायी अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मान्यवरांच्या येण्या-जाण्यामुळे सामान्य भाविकांच्या सुरक्षेवर परिणाम होऊ नये, त्यांच्यासाठी कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि महाकुंभात भाविकांना प्रवेश अन् बाहेर पडण्यासाठी अधिकाधिक जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.