प्रयागराज – मौनी अमावस्येच्या दिवशी संगम नोजवर (पवित्र स्नान करण्याचे महत्त्वाचे ठिकाण) झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाने कुंभनगरीतील नियोजनात पालट केले आहेत.
१. कुंभमेळा क्षेत्रात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
२. काली मार्गावरील वाहनतळ बंद करण्यात आला आहे.
३. लाल मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
४. प्रयागराजहून बाहेर जाणारे सर्व मार्ग अधिकाधिक मोकळे ठेवण्यात आले आहे.
५. अनेक मार्गांवर एकेरी वाहतूक व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
हे सर्व नियम ३ फेब्रुवारी, म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी असलेल्या तृतीय पवित्र स्नानापर्यंत लागू असतील.