१. जप तप जितका आनंदाचा तेवढेच व्यवहारी कर्म आनंदाचे वाटावे. केवळ माध्यम पालटले. परमेश्वर दोन्हीकडे सारखाच आहे. आपण आहोत हेच परमेश्वराचे अस्तित्व आहे.
२. ज्याला नामामध्ये गोडी आहे तो कुठेही अडकून राहू शकत नाही. जो असे जगायला शिकतो तो मुक्त होतो.
३. लोक सद्गुरु कसे अधिकारी आहेत याची चर्चा करतात; पण स्वतः तसे अधिकारी होण्याचा प्रयत्न करत नाहीत.
४. हिताचे जो सांगतो त्याच्या सहवासात रहाणे, हीच सत्संगती होय’.
– वि.श्री. काकडे (साभार : ग्रंथ ‘चिंतन’)