मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाची बुलडोझर कारवाईला स्थगिती !

  • नागपूर दंगलीतील सूत्रधार फहीम खान याचे घर पाडण्याचे प्रकरण

  • नागपूर महापालिकेने कारवाईचे आदेश देताच खानच्या आईने थेट गाठले उच्च न्यायालय

नागपूर दंगलीतील सूत्रधार फहीम खान

मुंबई – नागपूर दंगलीतील सूत्रधार फहीम खान याला अटक करण्यात आली होती. त्याच्या अनधिकृत दुमजली घरावर २३ मार्चला नागपूर महापालिकेने बुलडोझर फिरवला. त्याच्या घराचे अवैध बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने २४ तासांचा अवधी दिला होता; पण ते न हटवल्याने वरील कारवाई करण्यात आली. यावर खान याच्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका केल्यानंतर या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे पालिकेला अन्य एक आरोपी युसूफ शेख याच्या घरावर बुलडोझर फिरवता येणार नाही. या प्रकरणी पालिकेला १ आठवड्याच्या आत बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

एका दंगलखोर्‍याची आई थेट उच्च न्यायालयात जाते, यावरून हे संपूर्ण प्रकरण म्हणजे एक सुनियोजित कुभांड असून त्याचा सूत्रधार कुणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहे आणि फहीम खान हा या षड्यंत्राचा एक भाग आहे, हेच सिद्ध करते !