
मुंबई – विधानसभेत २४ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता तारांकित प्रश्नोत्तरे चालू झाली, त्या वेळी प्रश्न क्रमांक ३ आणि ४ पुकारल्यानंतर ज्यांनी प्रश्न विचारला आहे, ते सदस्य उपस्थित नव्हते. हे निदर्शनास येताच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, बर्याच वेळा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी प्रश्न विचारणारे सदस्य उपस्थित नसतात. यापुढे अनुपस्थित रहाणार्या सदस्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जाणार नाही, त्यांचे प्रश्न विचारार्थ घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले.
संपादकीय भूमिकाएवढेच नाही, तर अशा दायित्वशून्य आमदारांवर कारवाईही झाली पाहिजे, असेच संवेदनशील जनतेला वाटते ! |