प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज – काही मासांपूर्वी हत्या झालेला येथील कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या चकिया या परिसरातून अनेक वर्षांनंतर हिंदूंनी मिरवणूक काढली. चकिया या भागात अतिक अहमदची इतकी प्रचंड दहशत होती की, हिंदू तेथे मिरवणूक काढणे तर सोडाच; पण उघडपणे सण किंवा उत्सवही साजरा करू शकत नव्हते. तेथे कधीही कायद्याचे राज्य नव्हते, असे लोक म्हणतात. आता त्याच चकीया येथे दोनच दिवसांपूर्वीच श्री शंभू पंच अग्नी आखाड्याची भव्य पेशवाई (मिरवणूक) निघाल्याने हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे.