बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मागणी
कोलकाता (बंगाल) – केंद्र सरकारने बांगलादेशामधील अंतरिम सरकारशी बोलून आवश्यकता असेल, तर संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना बांगलादेशात सामान्य परिस्थिती पूर्ववत् करण्यासाठी पाठवावी. तेथे छळ होणार्या हिंदूंना तातडीने भारतात आणणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे तातडीने आवश्यक आहे, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत केली. बांगलादेशामधील सध्याच्या घडामोडींवर भारताची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत मांडावी, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, दोन्ही देशांच्या द्विस्तरावरील संबंधांवर बोलणे माझ्या अधिकाराबाहेरचे आहे; मात्र बांगलादेशामधील घडामोडी पहाता आणि बंगालमध्ये रहाणार्या नागरिकांनी त्यांच्या नातेवाइकांचे बांगलादेशामधील अनुभव सांगितल्यानंतर, तसेच येथील ‘इस्कॉन’च्या प्रतिनिधींशी बोलल्यानंतर मला विधानसभेत यावर बोलणे भाग पडले आहे
गेल्या १० दिवसांपासून केंद्र सरकार या विषयावर काहीही बोलत नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. ‘हे राजकीय सूत्र नसून बंगाली हिंदूंसाठी अस्तित्वाचे सूत्र आहे’, असेही मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या. (बंगाली हिंदूंच्या अस्तित्वाचे सूत्र केवळ बांगलादेशातच नाही, तर ममता बॅनर्जी यांच्या बंगालमध्येही आहे. बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी काय करत आहेत आणि बांगलादेशी घुसखोर, तर जिहादी मुसलमानांसाठी त्या काय करत आहेत, हे देशातील हिंदू पहात आहेत ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही शांतीसेना पाठवून हिंदूंचे रक्षण करून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना हाकलणे, तसेच जिहादी आतंकवाद्यांची नांगी ठेचणे आता आवश्यक झाले आहे ! |