मुंबईकर जागे रहा !
‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल’, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर हिंदूंची मुंबईतील भयावह स्थिती ‘मुंबईकर जागे रहा !’, या लेखमालेच्या माध्यमातून दर्शवत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई अन् सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा, ‘भगवा आतंकवाद’ म्हणून हिंदूना कलंकित करण्याचे षड्यंत्र, मुंबई सुरक्षित नाही, तसेच एकेकाळची शांत आणि सुंदर मालवणी झाली भकास’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
भाग ५.
भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/858623.html
आज आपण ‘आमची मुंबई’ एवढे म्हणून चालणार नाही. ‘मुंबई ही आपले दायित्व आहे’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यावर आपल्या लक्षात येईल, ‘खरोखर मुंबई जळत आहे आणि आपल्याला त्याची जाणीवही नाही.’ अमली पदार्थांनी तर मुंबईला केव्हाच विळखा घातलेला आहे. आर्यन खानच्या प्रकरणानंतर अमली पदार्थविरोधी पथकाची जोरदार मोहीम चालू आहे. ही मोहीम सध्या उच्चभ्रू लोकांमध्ये चालू झालेली आहे. तशी मोहीम या वस्त्यांमध्ये उघडण्याची आवश्यकता आहे. मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, त्यास हे गुंड तर उत्तरदायी आहेतच; पण त्यासह कायद्याचे रक्षकही उत्तरदायी आहेत. ही सगळी प्रकरणे त्यांच्या डोळ्यांसमोर घडत असतांना ते मूग गिळून गप्प राहिले. भीती म्हणा किंवा भ्रष्टाचार म्हणा, यामुळे मुंबईची तर वाट लागत आहे. येथील मराठी माणूस तर पलायन करत आहे ! त्यामुळे या घटनांना हे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. खरेतर त्यांनी स्थानिकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे होते.
हे जर असेच चालू राहिले, तर मुंबईचे भविष्य मात्र धोक्यात येईल आणि हे असे होऊ द्यायचे नसेल, तर आता तरी आपल्याला जागे झाले पाहिजे. मुंबई जळत आहे, याची जाणीव सर्वांना झाली पाहिजे. प्रत्येक मुंबईकराला कटु सत्य कळलेच पाहिजे, जेणेकरून तो सावध राहील आणि दुसर्यालाही सावध करील. आपण महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर यांचा ‘पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र’ म्हणतो. मग पुरोगामी विचारात या वरील भयावह गोष्टी बसतात का ? शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि करायचे मात्र त्याविरुद्ध. ‘राज्यघटना’, ‘राज्यघटना’ म्हणत ओरडायचे आणि त्याचा अपमान करणार्यांनाच पाठीशी घालायचे. ही कोणती स्थिती आहे ? हे मुंबईकर मुळीच सहन करणार नाहीत. आपल्याला या तालिबानी मानसिकतेपासून सावध राहिले पाहिजे.’
१. हिंदूंची संख्या न्यून होत आहे का ?
१ अ. इस्लामीकरण : इस्लामच्या स्थापनेपासून इस्लामी आक्रमकांनी युरोपसह आशिया खंडात टोळधाडी घातल्या. इराण, इंडोनेशिया, इजिप्त, तुर्कस्तान असे एका मागोमाग एक देश ‘इस्लामी’ बनले. त्यानंतर इस्लामी आक्रमकांची नजर वळली हिंदुस्थानकडे ! त्यांचे एकच लक्ष होते ते, म्हणजे लूट आणि तलवारीच्या जोरावर संपूर्ण जग इस्लाममय करणे. ही आक्रमणे तैमूरलंगापासून चालू झाली ते अगदी औरंगजेबासारख्या क्रूर आणि धर्मपिसाट बादशाहपर्यंत. इस्लामी आक्रमकांनी हिंदुस्थानात पाय रोवले. त्यांनी आपल्या संस्कृतीवर इस्लामी वरवंटा फिरवायला प्रारंभ केला. येथील कला, साहित्य यांवर इस्लामी शिक्के मारणे चालू केले. जर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवतार घेतला नसता, महाराणा प्रतापपासून छत्रसालपर्यंत हिंदूंनी लढा दिला नसता, तर खरच हिंदुस्थान हळूहळू इस्लामी देश बनला असता. केवळ अशा काही हिंदू नरविरांमुळे आजही हा देश ‘हिंदूंचा’ म्हणून ओळखला जात आहे.
१ आ. लोकसंख्या आणि इस्लाम यांची वाढ : हिंदुस्थानला युद्धात पराभूत करणे शक्य नाही, असे म्हटल्यावर त्यांनी रणनीती पालटली. आता त्यांची नवीन रणनीती आहे ती म्हणजे हळूहळू प्रत्येक भागात मुसलमान लोकसंख्या वाढवायची. काश्मीर, आसाम, केरळ, बंगाल ही राज्ये त्याची उदाहरणे आहेत. आता मुसलमान लोकसंख्या वाढवायची असेल, तर केवळ स्थानिक मुसलमान पुरेसे पडणार नाहीत, हे जाणून घुसखोरीला उत्तेजन देण्यात आले.
१ इ. लोकसांख्यिकी परिणाम : महाराष्ट्राचा विचार केला, तर हिंदु हे ७९.८३ टक्के, मुसलमान ११.५४ टक्के, बौद्ध हे ५.८१ टक्के, ख्रिस्ती ०.९६ टक्के, शीख ०.२ टक्के, आणि जैन १.२५ टक्के आहेत. मुंबईत मात्र हिंदु हे ६५.९९ टक्के, तर मुसलमानांची टक्केवारी ठळकपणे लक्षात येण्यासारखी, म्हणजे २०.६५ टक्के आहे. अन्य धर्मियांत ख्रिस्ती ३.२७ टक्के, शीख ०.४९ टक्के, बौद्ध ४.८५ टक्के, जैन ४.१० टक्के आणि इतर ०.४० टक्के आहेत. म्हणजेच जिथे हिंदु बहूसंख्य होते, तिथे हळूहळू आता हिंदूंची संख्या न्यून व्हायला लागली आहे.
१ ई. मुंबई इस्लाममय बनवण्याचा डाव (?) : मुंबईत मुसलमान घुसखोरांना घुसवण्याचे एक मोठ ‘रॅकेट’ (जाळे) आहे. बांगलादेशातील मुसलमानांना मुंबईत आणले जाते. त्यांना सौदी अरेबियाला पाठवण्यासाठी बनावट (खोटे) ‘व्हिसा’ सिद्ध केले जातात. नालासोपार्यात अशा मुसलमान तरुणांना आणून ठेवण्यात येते. त्यांची बनावट कागदपत्रे सिद्ध केली जातात. हे सगळे करणारे कोलकात्याचे मुसलमान आहेत. आता यातील बरेच बांगलादेशी मुसलमान मुंबईतच राहून अनैतिक धंदे करतात. अशा अनेक प्रकारे मुसलमानांची संख्या मुंबर्ईत वाढत चाललेली आहे.
२. शैक्षणिक स्तरावरही मुसलमानांना झुकते माप दिले गेले
शिक्षणातही मुसलमानांना झुकते माप देण्यात येत आहे. मुसलमानांना मदरशात प्रामुख्याने शिक्षण दिले जाते. त्या मदरशांना भरघोस आर्थिक साहाय्य तत्कालीन महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारकडून दिले गेले. जे सतत मराठी माणसांचे कैवारी असण्याचे ढोंग करतात, त्यांनीच आता मराठी शाळा बंद करायचा घाट घातला कि काय ? मराठी माध्यमांच्या शाळातील पटसंख्या ही जवळजवळ ६७ सहस्र ३३ ने घटली; मात्र त्याच वेळी उर्दू शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या मात्र दुपटीने वाढली आहे. (संदर्भ : ७ जुलै २०२१ या दिवशीची ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील बातमी) उर्दू माध्यमांच्या शाळा १९३ असून त्यात ६२ सहस्र ५१६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचाच दुसरा अर्थ असा की, मुंबईत मुसलमानांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे आणि हे दुर्लक्षित करण्यासारखे अजिबात नाही. ‘वर्ष २०५० मध्ये हिंदुस्थान हा ‘सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला देश’ असेल’, असे ‘प्यू रिसर्च’ या संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. आता वर्ष २०१० ते २०११ यामध्ये केलेल्या पहाणीनुसार मुसलमानांचा जननदर २४.७ टक्के, म्हणजे हिंदुस्थानच्या एकूण जननदरापेक्षा ७ टक्क्यांनी अधिक आहे. ही पहाणी सांगते, ‘वर्ष २०५० पर्यंत मुसलमान हे जगातील कुठल्याही देशापेक्षा सर्वाधिक हिंदुस्थानात असतील.’
(क्रमशः)
– मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम.
______________________________________________
भाग ६ वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/859798.html