धर्मांधांच्या सावटाखाली आलेला मालवणी परिसर !

मुंबईकर जागे रहा !

‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल’, असे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील हिंदूंची भयावह स्थिती दर्शवणारी ‘मुंबईकर जागते रहा !’, ही लेखमाला देत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई अन् सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा, ‘भगवा आतंकवाद’ म्हणून हिंदूना कलंकित करण्याचे षड्यंत्र, तसेच मुंबई सुरक्षित नाही’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

‘मुंबईचा मराठी माणूस हा मूलतः हिंदु आहे’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.‘हिंदुपणात मराठीपण सुरक्षित आहे’, हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांच्या चरित्रात अनुभवायला मिळते. आज मालाड-मालवणीची परिस्थिती इतकी गंभीर असूनही माध्यमांना त्याचे गांभीर्य अजूनही कळलेले नाही. मालवणीच्या परिस्थितीची चर्चा आंतरराष्ट्रीय मंचावर झाली पाहिजे इतकी तेथील परिस्थितीची भयंकर आहे.

भाग ३.

भाग २. वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/857700.html

१. एकेकाळची शांत आणि सुंदर मालवणी झाली भकास ! 

पूर्वी मालवणी हा परिसर पुष्कळ शांत आणि सुंदर होता. आज मालवणी ही अनधिकृत वस्त्या आणि गुन्हेगारांचे माहेरघर झाली आहे. नागरी सुविधांना पायदळी तुडवले जात आहे. अनधिकृत प्रार्थनास्थळे आणि हिंदूंना हद्दपार करण्याचे कारस्थान इथे मोठ्या प्रमाणात घडत आहे. मी केलेल्या निरीक्षणातून जे आकडे आणि सत्य परिस्थिती समोर आलेली आहे, ते पाहून माझे मन अगदी हेलावून गेले. केवळ १० वर्षांत येथील लोकसंख्या १ लाख ४७ सहस्रांनी वाढलेली आहे, म्हणजेच प्रतिदिन इथे ४० हून अधिक जणांचे स्थलांतर होत असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 २. अल्पसंख्यांक लोकवस्ती आणि अनधिकृत प्रार्थनास्थळे 

पूर्वीची कोळी हिंदु बांधवांची मालवणी आता अल्पसंख्यांक समुदायाची झालेली आहे. इथे अल्पसंख्यांकापैकी मुसलमान लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढलेले आहे. काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात छापून आलेल्या लेखानुसार या परिसरातील अनेक मुले ‘इस्लामिक स्टेट’सारख्या आतंकवादी संघटनेकडे आकर्षित होत असतात. येथील मुसलमान तरुणांना आतंकवादी संघटनेकडे आकर्षित होण्यापासून परावृत्त करण्यासाठी जुनेद महंमद नावाच्या एका व्यक्तीने एक संस्था चालू केली होती. जुनेद महंमदच्या म्हणण्यानुसार इथल्या मशिदीत अय्याज नावाचा एक इसम नमाज पढणार्‍या काही तरुणांना ‘इस्लामिक स्टेट’विषयी माहिती देत असे. ही अतिशय गंभीर आहे. ‘स्थानिक मुसलमान तरुणांची माथी प्रक्षोभक करून भारताच्या विरोधात त्यांचा वापर करण्याचे हे मोठे कारस्थान आहे’, असे म्हटले, तर चूक ठरणार आहे का ? ही मालवणीची अवस्था आहे. ‘गणेशोत्सवात विघ्न आणि अनधिकृत प्रार्थनास्थळांना मात्र अभय’, अशी येथील परिस्थिती आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात अल्पसंख्यांकांची शेकडो प्रार्थनास्थळे आहेत. मागील १० वर्षांत यांचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे.

३. हिंदूंवर लादलेला आर्थिक जिहाद

स्थानिकांनी मांडलेली व्यथा अशी की, एके दिवशी येथील हिंदु नागरिकांना एका फतव्याविषयी माहिती मिळाली. तो फतवा असा होता, ‘मालवणी परिसर मुसलमानबहुल असून कोणत्याही हिंदूंकडून कुणीही कोणतीही वस्तू विकत घेऊ नये’, असा स्थानिकांनी उल्लेख केला होता. हा फतवा तेथील मुसलमान लोक पाळतांना दिसले की काय, म्हणूनच तेथील हिंदूंच्या दुकानात कुणी जात नव्हते. दुकानावर अवलंबून असणार्‍या हिंदूंवर भयानक असे आर्थिक संकट कोसळले. काही वर्षांपूर्वी तेथील बहुसंख्य दुकाने ही हिंदूंची होती; पण आता मात्र तेथे मुसलमानांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत.

 ४. मालवणीतील ‘लँड’ (भूमी) जिहाद

‘लँड जिहाद, म्हणजे मालमत्ता वेगवेगळ्या मार्गाने बळकावणे’, हा प्रकार मालवणीत सर्रास चालतो. मालवणीतील छेडा कॉम्प्लेक्स ही मोठी वसाहत ! तिथे मोठ्या प्रमाणात हिंदु आणि जैन कुटुंबे रहायची. जिथे हिंदु बहुसंख्य असतात, तो विभाग अत्यंत शांत असतो. स्थानिकांच्या सांगण्यानुसार ईदला काही मुसलमान कुटुंबियांनी तिथे बकरा कापला. हे पाहून हिंदूंना धक्काच बसला. त्यांनी विनंती केली, ‘इथे बकरे कापू नका.’ मग त्यांनी पडदा लावून बकरा कापला. नंतर मात्र सगळेच जण बकरे कापू लागले. कालांतराने पडदा लागलेल्या जागी एक मशीद उभी राहिली. मुसलमान बांधवांच्या धार्मिक गोष्टीत त्यांना त्रास होऊ नये म्हणून हिंदु शांत राहिले.

आता भूमी जिहाद कसा केला जातो, ते पहा. स्थानिकांनी सांगितले, ‘मग जागोजागी बकरे कापू लागले. मुलींची छेड काढू लागले. लोकांना स्वतःच्या हक्काच्या घरांमध्ये रहायचीसुद्धा भीती वाटू लागली. या विरोधात तक्रार केली की, शेकडो मुसलमान घेराव घालू लागले. त्यामुळे तक्रार करण्याचीही चोरी होती. ‘जिवंत रहायचे असेल, तर गप्प रहा, नाही तर निघून जा’, हे दोनच पर्याय या गुंडांनी हिंदु सज्जनांना दिले होते. त्यामुळे हिंदु जिवाला घाबरून स्वतःची घरे विकू लागले; पण तेथील परिस्थिती भयानक आणि इतकी दहशतीची आहे की, इतर हिंदू येथे घर घेईना; पण मुसलमान मात्र तेथे घर घेण्यास उत्सुक असतात.’

(क्रमशः)

– मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम.

भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/858623.html