पेट्रोल बाँबने केले होते आक्रमण !
लुधियाना (पंजाब) – येथे शिवसेना (हिंद) या पक्षाचे नेते हरकिरत सिंह खुराणा यांच्या घरावर २ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या पेट्रोल बाँब आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. यांमध्ये मनीष, रविंदरपाल सिंह, अमित आणि जसविंदर सिंह यांचा समावेश आहे, तर लवप्रीत सिंह हा आरोपी पसार आहे. या आक्रमणात कुणीही घायाळ झाले नाही.
या प्रकरणाची माहिती देतांना लुधियानाचे पोलीस आयुक्त कुलदीप सिंह चहल यांनी सांगितले की, याविषयी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कारवाई चालू केली. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या आतंकवादी संघटनेचा कट्टर आतंकवादी हरजीत सिंह उपाख्य लड्डीकडून सूचना मिळत असल्याचे समोर आले आहे.
पोलीस आयुक्त कुलदीप सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी १६ ऑक्टोबर या दिवशी शिवसेना (भारतवंशी) याचे नेते योगेश बक्षी यांच्या घरावर पेट्रोल बाँब फेकला होता. या घटनांचा उद्देश पंजाबमधील शांततापूर्ण वातावरण बिघडवणे हा होता.