Harvard Scientist Claims God Is Real : गणितीय सूत्र देवाच्या अस्तित्वाचा अंतिम पुरावा असू शकते !

हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञाचा दावा

भौतिकशास्त्रज्ञ आणि एयरोस्पेस इंजिनिअर डॉ. विली सून

केंब्रिज (अमेरिका) – हार्वर्ड विद्यापिठातील प्रसिद्ध गोल भौतिकशास्त्रज्ञ आणि एयरोस्पेस इंजिनिअर डॉ. विली सून यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा गणिताच्या सूत्राद्वारे पुरावा देण्याचा दावा केला आहे. त्यांनी ‘फाइन ट्यूनिंग अर्ग्युमेंट’वर भर देत सांगितले की, गणितीय सूत्र हे देवाच्या अस्तित्वाचा अंतिम पुरावा असू शकते. ब्रह्मांडाचे नियम इतके अचूक आणि संतुलित आहेत की, त्यामुळेच जीवन अस्तित्वात आहे. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून ते पदार्थ आणि ऊर्जेचा अचूक समतोल, यांमुळेच ब्रह्मांडाचा समतोल टिकून आहे.

१. डॉ. सून यांनी म्हटले की, ब्रह्मांडात पदार्थ आणि प्रतिपदार्थ (एंटीमॅटर) संपूर्णपणे समान प्रमाणात असले असते, तर जीवन अस्तित्वातच येऊ शकले नसते; मात्र या दोघांमध्ये असलेली असमानता ही एका उच्च शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा देते.

२. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पॉल डिराक यांनी एका गणितीय समीकरणाच्या साहाय्याने प्रतिपदार्थ (एंटीमॅटर) असल्याचे भाकित केले होते. त्यांनी म्हटले होते की, या गोष्टींकडे पाहून कुणी असेही म्हणू शकेल की, देव एक महान गणितज्ञ आहे.

३. डॉ. सून यांनी डिराक यांच्या सूत्राचा संदर्भ देत सांगितले की, काही गणितीय समीकरणे आरंभी अवघड वाटू शकतात; मात्र ती ब्रह्मांडाच्या गूढ सत्यांना उलगडू शकतात.

संपादकीय भूमिका

‘देव नाही’, असे वारंवार म्हणणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी आणि देवाच्या अस्तित्वाचे पुरावे मागणारे बुद्धीप्रामाण्यवादी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?