भावाच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

पू. संदीप आळशी

१. ‘ईश्वरप्राप्ती होण्यासाठी आपल्यामध्ये नुसता भाव नव्हे, तर शुद्ध भाव (भक्ती) निर्माण होणे आवश्यक असते. अंतःकरण शुद्ध झाल्याविना भावाचे रूपांतर शुद्ध भावात होऊ शकत नाही.

२. ‘नामजप कोणता करतो ?’ हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ‘तो करण्यामागचा आणि करतांनाचा भाव’ हेही महत्त्वाचे आहे.

३. दुसर्‍यांविषयी नकारात्मक बोलण्यामुळे आपल्यामधील भावाची पातळी अल्प होऊ लागते.

४. प्रतिकूल परिस्थितीत भावाच्या स्तरावर रहाता येण्यासाठी अनुकूल स्थिती असतांनाच भाव जागृत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात.’

– (पू.) संदीप आळशी (१६.९.२०२४)