Nepal Ghar Wapsi : नेपाळमध्‍ये २ सहस्र ख्रिस्‍त्‍यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

विहिंपने आयोजित केला होता धार्मिक कार्यक्रम

हिंदु धर्मात प्रवेश करण्यासाठी जमलेले ख्रिस्ती

काठमांडू (नेपाळ) – येथे २ सहस्र ख्रिस्‍त्‍यांनी नुकतीच हिंदु धर्मात घरवापसी (पुनर्प्रवेश) केली. विश्‍व हिंदु परिषदेने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिंदु धार्मिक परंपरांनुसार घरवापसी करण्‍यात आली. हिंदु धर्मात पुन्‍हा आल्‍यानंतर हे लोक  अतिशय आनंदी दिसत होते. यापूर्वीही मध्‍यप्रदेशातील इंदूर येथील एमखजराना गणेश मंदिरात ८ मुसलमान व्‍यक्‍तींनी हिंदु धर्म स्‍वीकारला.

घरवापसी कार्यक्रमाविषयी भीम पराजुली नावाच्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठाने म्‍हटले की, ज्‍या व्‍यक्‍तींनी प्रलोभनातून किंवा अज्ञानामुळे ख्रिस्‍ती धर्म स्‍वीकारला होता, त्‍यांचे पुन्‍हा सनातन धर्मात स्‍वागत करण्‍यात आले आहे. नेपाळमधील सुनसरी, मोरंग आणि इतर जिल्‍ह्यांतील सहस्रावधी लोक स्‍वेच्‍छेने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करत असल्‍याचेही ते या वेळी म्‍हणाले.

संपादकीय भूमिका

कुठे बळजोरी अथवा आमिषे दाखवून अन्‍य पंथियांना स्‍वत:कडे ओढणारे इस्‍लाम आणि ख्रिस्‍ती पंथ अन् कुठे असे काही न करता केवळ आपल्‍या अद्वितीय शिकवणीमुळे सहस्रावधी लोकांना स्‍वत:कडे आकर्षित करणारा हिंदु धर्म !