‘आरक्षण नको, हिंदु एकता हवी’ यासाठी जनजागृती
सांगली, १६ ऑगस्ट (वार्ता.) – येथील मारुति चौक येथे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने ‘आरक्षण नको, हिंदु एकता हवी’ या संदर्भात जागृती करत नागरिकांना विनामूल्य जिलेबी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी ‘वन्दे मातरम्’, ‘भारतमातेचा विजय असो’, ‘हिंदु धर्म की जय’ अशा विविध घोषणा दिल्या. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सुरेश टेंगले, संतोष देसाई, रवींद्र ढगे, मंगेश चव्हाण, नितीन राक्षे, गणेश सगरे, बाबासाहेब पाटील, गणेश मोहिरे, दत्तात्रय हसबे, करण सिंग, यश मदने आदी उपस्थित होते.