संतश्री पू. आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून ७ दिवसांसाठी पॅरोल संमत

महाराष्ट्रात उपचारासाठी जाण्याची अनुमती

(पॅरोल म्हणजे बंदीवानाला अटींवर काही दिवसांसाठी बाहेर सोडणे)

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

जोधपूर (राजस्थान) – कथित बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाने ७ दिवसांचा पॅरोल संमत केला आहे. प्रकृतीच्या कारणावरून न्यायालयाने हा पॅरोल दिला आहे. महाराष्ट्रातील माधवबाग येथे उपचारासाठी जाण्याची न्यायालयाने अनुमती दिली आहे. पॅरोलच्या काळात पू. बापू यांना पोलीस कोठडीतच रहावे लागणार आहे. वर्ष २०१३ पासून ते जोधपूर येथील कारागृहात आहेत.