Himanta Biswa Sarma : केंद्रातील भाजप सरकारने मुसलमानांना सर्व काही दिले; मात्र मुसलमानांंनी भाजपला मतदान केले नाही !

आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गोहत्ती (आसाम) – केंद्रातील भाजप सरकारकडून मुसलमानांना घरे, शौचालये, रस्ते, सरकारी नोकर्‍या, रेशन आणि प्रतिमहा १ सहस्र २५० रुपये मिळाले; मात्र त्यांनी मतदान काँग्रेसला  केले; कारण त्यांना लांगूलचालन हवे आहे. एवढेच नाही, तर त्यांचा उद्देश ‘विकास नव्हे, तर मोदी यांना हटवून स्वतःच्या धर्माचा दबदबा कायम ठेवणे’, हा होता, असे विधान येथे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

संपादकीय भूमिका

हिंदूंनी मते देऊनही त्यांना काहीही मिळाले नाही, तरीही त्यांनी परत मते दिली; मात्र ज्यांनी आधीही मते दिली नाहीत, त्यांना सरकारने सर्व काही दिले. ही मानसिकता आधी का ओळखता आली नाही ? हिंदूंना आता तरी काही मिळेल का ?