भंग पावलेले शिवधनुष्य प्रभु श्रीरामाने भूमीवर टाकले, तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले.
श्रीराम : काय वाटते ?
धनुष्य : आनंदच आनंद ! एखाद्या राक्षसाने उचलले असते, तर जन्मभर धनुष्य-बाणांच्या बंधनात पडलो असतो. श्रीरामाने मला मुक्त केले.
श्रीराम : पण मी भूमीवर टाकले त्याचे काय ?
धनुष्य : श्रीरामाच्या पायाशीच टाकले आणि मला पादसेवा करण्याची संधी दिली.
श्रीराम : पण तुझे दोन तुकडे केले, त्याचे काय ?
धनुष्य : माझा अहंकार तोडला. माझे दोन तुकडे झाले; पण त्या तुकड्यांमुळे दोन जिवांचे (राम-सीतेचे) मीलन झाले.
– श्री. सुभाष भवाडकर
(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)