Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये लागलेल्या आगीमुळे तब्बल १६७ हेक्टर जंगल जळून भस्मसात !

आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू !

डेहराडून (उत्तराखंड) – राज्यातील जंगलात लागलेली आग अजून आटोक्यात आलेली नाही. ही आग अनेक गावांमध्ये पसरली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात आगीच्या साधारण ११० वेगवेगळ्या घटना घडल्या.

आगीमुळे राज्यातील अनुमाने १६७.२ हेक्टर जंगले जळून नष्ट झाली आहेत, तसेच ५ जणांचा जीव गेला आहे. आग विझवण्यासाठी वन विभागासह स्थानिक लोकही परिश्रम करत आहेत. जंगलातील आग विझवण्यासाठी सैन्याच्या हेलिकॉप्टरचाही वापर केला जात आहे.