Jaishankar Slams Foreign Media : भारतातील निवडणुकांवर टीका करून त्यावर प्रभाव पडेल, हा निवळ भ्रम !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

भाग्यनगर (तेलंगाणा) –  पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे भारतीय निवडणुकीत स्वत:ला राजकीय खेळाडू मानत आहेत. ते लोकशाहीवर टीका करत असतील, तर ते माहितीच्या अभावामुळे नाही. ते असे करतात; कारण त्यांना वाटते की, त्याचा भारताच्या निवडणुकांवर परिणाम होईल, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी विदेशी प्रसारमाध्यांना फटकारले.

परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले की, विदेशातील एका लेखात लिहिले होते की, ‘भारतात एवढी उष्णता आहे, अशा वेळी ते निवडणुका का घेत आहेत ?’ यावर मला सांगायचे आहे की, या उन्हातही भारतात मतदानाचे प्रमाण तुमच्यापेक्षा अधिक आहे. भारतात सर्वांत मोठ्या मतदानाचा विक्रम आहे. भारताचे राजकारण आता जागतिक स्तरावर पोचले आहे. परदेशी माध्यमांना त्यात ढवळाढवळ करण्याची आवश्यकता आहे, असे वाटते. आता वेळ आली आहे की, आपण त्यांचा हा भ्रम दूर करू. हे केवळ आत्मविश्‍वासानेच होऊ शकते.

मुंबईवरील आक्रमणानंतर काँग्रेस सरकारने कोणतीही कारवाई केली नाही !

वर्ष २००८ च्या मुंबईवरील जिहादी आतंकवादी आक्रमणाविषयी परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, या आक्रमणानंतर काँग्रेस सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. आपण निष्क्रीय बसलो; कारण सरकारचा असा विश्‍वास होता की, पाकिस्तानवर आक्रमण न करणे देशासाठी अधिक लाभदायक आहे.

संपादकीय भूमिका

पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे नेहमीच स्वतःला अधिक शहाणी समजतात. भारताविषयी तर त्यांना अधिक द्वेष अन् पूर्वग्रह आहे, जो नेहमीच दिसून येतो ! अशांना फटकारण्यासह भारतात बंदी घालणेच आवश्यक आहे !