Swatantrya Veer Savarkar Movie : रामराज्य उपवास करून नाही, तर रावण, त्याचे भाऊ आणि त्याचे सैन्य यांचा वध करून मिळाले होते !

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या दुसर्‍या विज्ञापनात  (ट्रेलरमध्ये) सावरकरांचा संवाद !

मुंबई – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या २२ मार्च २०२४ या दिवशी प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाचे दुसरे विज्ञापन (ट्रेलर) प्रदर्शित झाले आहे. याच्या पहिल्याच दृश्यात मोहनदास गांधी ‘रामराज्य त्याग आणि उपवास यांमुळे मिळाले होते’, असे म्हणतांना दिसत आहेत. त्यावर सावरकर यांचे प्रत्युत्तरादाखल ‘रामराज्य उपवास करून नाही, तर रावण, त्याचे भाऊ आणि त्याचे सैन्य यांचा वध करून मिळाले होते ’, असे म्हणतांना दिसत आहेत.

विज्ञापनातील काही दृश्य आणि संवाद !

अ. मोहनदास गांधी : मुसलमानांना स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी आपल्याला त्यांना साथ दिली पाहिजे.

आ. अंदमानच्या कारागृहात मुसलमान पोलीस सावरकरांना खेचून नेत असतांना सावरकर म्हणतात, ‘कसा मुसलमान आहेस तू ? तू देशाचा झाला नाहीस ? मुसलमान बनायचे असेल, तर बहादूर शहा जफरसारखा (मोगलांचा शेवटचा बादशहासारखा) मुसलमानाचा वंशज हो. ते देशाला धर्मापेक्षा वर ठेवत होते.

इ. सावरकर आणि गांधी यांच्या भेटीचा प्रसंग या वेळी सावरकर गांधी यांना म्हणतात, ‘‘२५ टक्के मुसलमानांसाठी ३६ टक्के जागा ? म्हणजे एक मुसलमान मत ३ हिंदु मतांच्या बरोबर असेल ?’

गांधी : हा मुसलमानांचा अधिकार आहे

सावरकर : का ? या ख्रिस्त्यांच्या (ब्रिटिशांच्या) पूर्वी मुसलमान आपले मालक होते म्हणून ?

गांधी : तुम्हाला अल्पसंख्यांकांची भीती जाणवत नाही ?

सावरकर : तुम्हाला ८०० वर्षे गुलाम असणार्‍या बहुसंख्यांकांचे दुःख समजत नाही ?

ई. सावरकरांना ‘तुम्ही गांधी यांचा द्वेष करता’ असे म्हटले जात असतांना ते म्हणतात, ‘मी गांधींचा नाही, तर अहिंसेचा द्वेष करतो.’