LeT Terriorist Encounter : काश्मिरी हिंदूंच्या हत्या करणारा जिहादी आतंकवादी ठार !

आतंकवादी बिलाल अहमद भट

शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथे लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद भट याला सुरक्षादलांनी चकमकीत ठार मारले. तो गेल्या वर्षभरात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी हिंदू यांच्या हत्यांमध्ये सहभागी होता. बिलालने किमान १२ स्थानिक तरुणांना आतंकवादी बनण्याचे आमीष दाखवले होते.