Pakistan Elections : निवडणुकीत विजयी झाल्यास पाकमधील हिंदूंच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार !

पाकिस्तानमधील पहिल्या महिला उमेदवार डॉ. सवीरा प्रकाश यांचे आश्‍वासन !

पाकिस्तानमधील पहिल्या महिला उमेदवार डॉ. सवीरा प्रकाश

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या प्रांतातील बुनेर येथून सार्वत्रिक निवडणुकीत उभ्या राहिलेल्या पहिल्या हिंदु महिला डॉ. सवरा प्रकाश यांची पाकमध्ये सर्वत्र चर्चा आहे. त्यांनी स्वतःला एक ‘देशभक्त हिंदु’ म्हटले आहे. डॉ. सवीरा यांनी म्हटले आहे की, जर त्या निवडणुकीत जिंकल्या, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘सेतू’चे काम करणार असून पाकिस्तानमधील हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठीै साहाय्य करणार आहेत.

डॉ. सवीरा यांनी म्हटले आहे की, मतदारसंघातील मुसलमानांनी मला मत देण्याचे आश्‍वासन देऊन मला पाठिंबा दिला आहे. माझ्या विजयानंतर दोन्ही देशांतील हिंदू माझ्याशी निर्भयपणे संपर्क करू शकतात. दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यासाठी मी सकारात्मक भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करीन.

संपादकीय भूमिका

  • डॉ. सवीरा प्रकाश यांना विजयासाठी शुभेच्छा ! तसेच त्या विजयी झाल्यावर त्यांना पाकिस्तानी शासनकर्ते आणि मुसलमान हिंदूंसाठी कार्य करू देतील, अशी अपेक्षा !