मुंबई – देशात २४ घंट्यात ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये १२८ रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये ७३ नवे रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात कोरोनाचे २८ रुग्ण असून ‘जे.एन्.१’ व्हेरिएंटचे ५ रुग्ण आहेत. वातावरणात पालट झाल्याने हे रुग्ण वाढल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षीही हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाने काळजी घेण्याची चेतावणी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात रुग्ण वाढत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. मास्क लावणे, काळजी घेणे, अंतर ठेवणे, हात धुणे, जवळ येऊन न बोलणे आवश्यक आहे. निष्णात डॉक्टरांचे मत आहे, ‘घाबरून जाऊ नका, काळजी घ्या.’
जगभरातील व्यवहार सुरळीत झाले असतांना परत एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने सर्वांची धाकधूक वाढली आहे.