कर्नाटक राज्यातील ‘अहोबिलम्’ येथे लक्ष्मी-नरसिंह मंदिराच्या जवळच देवीचेही देऊळ आहे. मी काही वेळ देवीसमोर प्रार्थना करण्यासाठी बसले. मी प्रार्थना करत असतांना काढलेल्या छायाचित्रात माझ्या गळ्यात असलेल्या श्रीयंत्रातून, म्हणजेच देवीयंत्रातून प्रकाश बाहेर पडतांना प्रत्यक्ष दिसते. गुरुदेवांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आणि मला गळ्यात घालायला दिलेल्या श्रीयंत्रातील देवीतत्त्वाची ती एक प्रकाशस्वरूप अनुभूतीच होती. देवीसमोर बसून प्रार्थना करतांना गळ्यातील श्रीयंत्र एका दिव्य प्रकाशाने उजळलेले छायाचित्रात दिसत आहे. साक्षात् गुरुदेवांनी दिलेल्या श्रीयंत्रातील देवीतत्त्वाच्या जागृतीची ती एक अनुभूती होती. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (४.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |