नव्‍या पिढीचे कर्तव्‍य !

कै. (परात्‍पर गुरु) परशराम पांडे महाराज

दीपावली खर्‍या अर्थाने साजरी करण्‍यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्‍यावा. केवळ रूढी म्‍हणून चालू असलेले सण, रूढी म्‍हणून न पाळता, खर्‍या अर्थाने त्‍यांना उजाळा द्यावा. म्‍हणजे दीपोत्‍सव खर्‍या अर्थाने साजरा होऊन समाजातील सर्व थरांतील लोकांना आनंद लुटता येईल.

‘हे प्रभो, हे भाग्‍य लवकरात लवकर आम्‍हाला मिळू दे. म्‍हणजे योग्‍य, समजदार, वीर, सज्‍जन युवक सभासद म्‍हणून निवडून येतील. अशा कणखर सभासदांकडून लोकसभेद्वारे भारताचे चित्र बदलू शकते. दिपावलीची पंचमीद्वारे होणारी सांगता अशा रितीने फलरूपाला येऊ दे.’ म्‍हणूनच ऋषि म्‍हणतात, ‘युवास्‍य यजमानस्‍य वीरोजायताम् ।’

– कै. (परात्‍पर गुरु) परशराम पांडे महाराज