अन्य साधनामार्गांच्या तुलनेत भक्तीयोगाचे श्रेष्ठत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘कलियुगात भक्तीयोगाप्रमाणे साधना करून ईश्‍वरापर्यंत लवकर जाता येते. भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग या विविध मार्गांनी साधना करतांना त्यातील ज्ञानयोग आणि कर्मयोग हे अधिक करून तात्त्विक स्तरावरील साधनामार्ग आहेत.

ज्ञानयोग

‘अहं ब्रह्मास्मि ।’ म्हणजे ‘मी ब्रह्म आहे.’ हा विचार मनात जागृत ठेवून दैनंदिनी कृती कराव्या लागतात.

कर्मयोग

‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥

(अर्थ : तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे; पण कधीही तुला त्याच्या फळांविषयी अधिकार नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.) या श्रीमद्भगवद्गीतेतील, अध्याय २, श्‍लोक ४७ नुसार कर्म करावे लागते.

या दोन्हीच्या तुलनेत भक्तीयोग हा प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा सोपा मार्ग आहे, उदा. देवपूजा, स्तोत्रपठण करणे, दैनंदिन कृती करतांना नामजप करणे. इत्यादींमुळे भक्तीयोगानुसार साधना करून आध्यात्मिक उन्नती होण्याचे प्रमाण अधिक असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले