मध्यप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त करण्यात आल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, मुले आणि त्यांचे पालक यांनी हा चित्रपट अवश्य पाहिला पाहिजे. हा चित्रपट ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांना उघडे करत आहे. ‘क्षणिक भावनेपोटी मुली लव्ह जिहादमध्ये अडकतात आणि त्यांचे जीवन कसे उद्ध्वस्त होते’, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. आतंकवाद्यांचे षड्यंत्रही यात उघड करण्यात आले आहे. आम्ही राज्यात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा बनवला आहे; मात्र हा चित्रपट लव्ह जिहादविषयी अधिक प्रमाणात जागृती करत आहे. यासाठीच तो करमुक्त करत आहोत.