हाथरस (उत्तरप्रदेश) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक करायला लावले नमाजपठण !

पालक आणि हिंदु संघटना यांच्या विरोधानंतर मुख्याद्यापिका आणि २ शिक्षक निलंबित

नमाजपठण करताना शाळेतील विद्यार्थीनी

हाथरस (उत्तरप्रदेश) – येथील ‘बी.एल्.एस्. इंटरनॅशनल स्कूल’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना १८ एप्रिल या दिवशी एका कार्यक्रमात बलपूर्वक नमाजपठण करण्यास लावल्यावरून पालक संतप्त झाले. यास प्रत्युत्तर म्हणून हिंदु संघटनांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर हनुमान चालिसाचे पठण केले. त्यांच्या विरोधानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापिका सोनिया, तसेच शिक्षक इरफान इलाही आणि कंबर रिझवान यांना निलंबित केले आहे.

पालकांचा आरोप आहे की, मुलांच्या मनगटावरील लाल धागेही काढायला लावले. या शाळेत यापूर्वीच विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास आणि विद्यार्थिनींना मेंदी काढण्यास बंदी घालण्यात आली होती. पालक आणि हिंदु संघटना यांनी शिक्षकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात एक चौकशी समिती स्थापन केली असून ती ५ दिवसांत याचा अहवाल देणार आहे.

संपादकीय भूमिका 

जर एखाद्या शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांना हिंदूंची प्रार्थना, श्‍लोक, मंत्र म्हणण्यास सांगण्यात आले असते, तर एकजात निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांनी आकांडतांडव केला असता; मात्र आता ते शांत आहेत, हे लक्षात घ्या !