पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ युद्धसेनानी !
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य महाराष्ट्र आणि दक्षिणेतील काही राज्यांपुरते मर्यादित होते. तरीही आज भारतभरातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांना आदर्श मानतात. या संघटनांचे फलक, नियतकालिके, संकेतस्थळे इत्यादी प्रसारसाहित्यावर शिवछत्रपतींचे चित्र आवर्जून असते; कारण म्हणजे शिवरायांनी ‘हिंदवी स्वराज्या’चे जे ध्येय ठरवले, ते प्रत्यक्षात साकारून दाखवले. तसे अन्य राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक आणि राजे यांना जमले नाही. कार्य करतांना यश संपादन करायचे असल्याने पराभूतांचा आदर्श ठेवला जात नाही, तर विजयी विरांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवला जातो, हेच भारतभरातील संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्यामागील तत्त्व आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
इतिहासातील अजरामर व्यक्तिमत्त्व !
धर्मांतरित न होण्यासाठी भीषण नरकयातना भोगणारे छत्रपती संभाजी महाराज हे आदर्शच !
‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतर करावे, यासाठी कपटी औरंगजेबाने त्यांना सव्वा मास भीषण अशा नरकयातना दिल्या. त्यांची नखे उपटून बोटे खार्या पाण्यात बुडवणे, डोळ्यांत तप्त झालेल्या सळ्या घालणे, कातडी सोलून शरिरावर तिखट चोळणे, बोडक्या उंटावर उलटे बसवून त्यांच्या पार्श्वभागावरची आणि मांडीची कातडी सोलून काढणे, वाघनखांनी पोट आणि पाठ यांची त्वचा टराटरा फाडणे अन् शेवटी कुर्हाडीने शीर धडावेगळे करणे अशा कितीतरी महाभयंकर यातना दिल्या गेल्या, तरीही ते ध्येयापासून कदापी ढळले नाहीत आणि धर्मांतरित झाले नाहीत. या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदु समाजासमोर धर्मवीरत्वाचा सर्वश्रेष्ठ आदर्श निर्माण केला आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले