पुणे येथे ३१ डिसेंबरनिमित्त लाखो नागरिकांना दिले १ दिवस मद्यप्राशन करण्याचे परवाने !

पुणे – जिल्ह्यातील १ लाख ६५ सहस्र नागरिकांना मद्य प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ दिवसासाठी परवाने दिले आहेत. ‘वन डे परमिट’ची किंमत ५ रुपये आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे. त्यामुळे येथे ३१ डिसेंबरच जोरात साजरे केले जाणार आहे. पुणेकरांकडून ‘वन डे परमिट’साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. परवान्याची संख्या आणखी वाढण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे. मद्यप्रेमींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची ३१ डिसेंबरला करडी नजर असणार आहे.

विनापरवाना मद्य प्राशन किंवा विक्री केली, तर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका 

सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे. समाजाला योग्य-अयोग्य समजण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.