हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘खोके सरकार, ओके सरकार’च्या विरोधकांच्या घोषणा !

विधिमंडळ इमारतीच्या पायर्‍यांवर आंदोलन करणारे विरोधक

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर ‘खोके सरकार, ओके सरकार’ अशा सत्ताधारी पक्षांच्या विरोधात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांसह महाविकास आघाडीचे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर विरोधकांनी कर्नाटक, तसेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हातात फलक धरून निषेधाच्या घोषणा दिल्या.