श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
  • ‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो.
  • देवाप्रती भाव असेल, तर तो प्रत्येक परिस्थितीत आपल्याला स्थिर ठेवतो. भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते आणि आपल्याला साधनेत पुढे नेते.
  • गुरुमुखातून आलेले शब्द नादरूपाने आकाशमंडलात रहातात. गुरूंचे हे चैतन्यमय शब्द प्रत्यक्षात उतरवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अध्यात्मात गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे, तरच आपली प्रगती होते.’
  • सनातन संस्था म्हणजे केवळ एक संस्था नसून तेथे हिंदु राष्ट्राचे (ईश्वरी राज्याचे) प्रत्यक्ष वातावरण आहे. हे वातावरणच पुढे पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची निर्मिती करणार आहे.
  • उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम प्रत्येक गोष्टीला लागू पडतो; म्हणून कोणत्याच गोष्टीत अडकू नये. कोणतीच गोष्ट ‘माझी, माझी’ म्हणू नये. ‘ती एक दिवस नष्ट होणार’, हे ओळखून असावे. मनाला अशा पद्धतीने समजावले, तर मन कोणत्याच गोष्टीत अडकत नाही. मनाला विषयापासून दूर नेल्यावर आपोआपच मनुष्याची त्या त्या गोष्टीतील आसक्ती संपते आणि जीवनात ईश्वरप्राप्तीच्या दिशेने प्रगती होते.