सप्तर्षींच्या आज्ञेने १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिले. या कार्यक्रमाचे एका संतांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.
१. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण
२. दत्तरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यात जाणवलेली स्पंदने आणि त्यांचे विश्लेषण
२ अ. विष्णुतत्त्व
२ अ १. विष्णुतत्त्वाचे कवच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या देहाभोवती असणे : याचे कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यात विष्णुतत्त्व आहे.
२ आ. दत्ततत्त्व
२ आ १. दत्ततत्त्वाचे वलय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मुखाभोवती कार्यरत होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे दत्ततत्त्व आकृष्ट झाल्याने असे झाले. याचे कारण सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिल्यामुळे त्यांना सप्तर्षींचे आशीर्वाद मिळाले.
२ आ २. दत्ततत्त्वाचे ज्ञानाचे वलय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मुखाभोवती कार्यरत होणे : त्यामुळे संत आणि साधक यांना साधनेत पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी शक्ती मिळाली.
२ आ ३. दत्ततत्त्वाचे कण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडून वातावरणात प्रक्षेपित होणे : समष्टी सेवा (समाजात जाऊन अध्यात्माचा प्रसार करणे) करण्यासाठी संत आणि साधक यांना आवश्यक ज्ञान मिळण्यासाठी दत्ततत्त्वाचे कण आशीर्वादाच्या स्वरूपात प्रक्षेपित झाले.
२ इ. गुरुतत्त्वाचे वलय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून संत आणि साधक यांच्याकडे प्रक्षेपित होणे : या माध्यमातून त्यांनी सर्व संत आणि साधक यांना व्यष्टी अन् समष्टी (अध्यात्मप्रसार) साधना करण्यासाठी आशीर्वाद दिला.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पूजा करत असतांना जाणवलेली सूत्रे
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पूजा करत असतांना पुष्कळ प्रमाणात चैतन्य अन् परमानंद कार्यरत होऊन ते संपूर्ण पृथ्वीवर व्यापक स्वरूपात प्रक्षेपित होत होते.
आ. साधकांना आशीर्वाद देण्यासाठी सूक्ष्मातून सर्व साधू उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही सर्व साधकांना सूक्ष्मातून आशीर्वाद दिला.
इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमीच साधक आणि ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या त्यांच्या समष्टी कार्याचा विचार करत असतात. त्यामुळे ‘त्यांच्याकडून चैतन्याचा एक तेजस्वी गोळा पृथ्वीवर येत आहे आणि ते चैतन्य व्यापक स्वरूपात संपूर्ण वातावरणात पसरत आहे’, असे मला दिसले.
ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले देहाने उपस्थित असले, तरी ते पूर्णतः ईश्वराशी एकरूप झाले होते, ते निर्गुणावस्थेत होते.
उ. श्रीसत्शक्ति बिंदाताई आणि श्रीचित्शक्ति गाडगीळकाकू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पूजा करत असतांना त्यांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) ‘माझी पूजा होत नसून माझे गुरु भक्तराज महाराज यांची आणि श्रीविष्णूची पूजा होत आहे’, असा भाव होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्णतः ईश्वराशी एकरूप झाले असल्याने त्यांचा असा भाव होता.
ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दत्तगुरु निर्गुण स्थितीत असून ते आनंदावस्थेत होते. मी त्यांच्या डोळ्यांकडे पाहिले, तेव्हा मला त्यांचे डोळे श्री दत्तगुरूंच्या डोळ्यांसारखेच वाटले. ‘सर्व साधकांकडे ते आनंदाने पहात आहेत’, असे मला जाणवले.
– एक संत (१.८.२०२२)
|