धनबाद (झारखंड) येथे करण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’तील मागणी !
धनबाद (झारखंड) – सरकारी आदेशाकडे दुर्लक्ष करून रविवारऐवजी शुक्रवारच्या दिवशी सुटी देणारे झारखंड, बंगाल, बिहार आदी राज्यांमध्ये केंद्रीय अन्वेषण यंत्रणा पाठवून व्यापक चौकशी करण्यात यावी आणि दोषींच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी, तसेच ‘सर तन से जुदा’ या षड्यंत्रामध्ये सहभागी लोकांवर ‘यूएपीए’ (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हे नाेंदवून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. याचसमवेत देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिरापूर येथील रणधीर वर्मा चौकामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले.
या आंदोलनानंतर धनबाद जिल्हा उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये तरुण हिंदूचे श्री. उज्ज्वल बॅनर्जी, सारथी साहाय्यता समिती, हजारीबागचे श्री. गौतम सिंह; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अंशु तिवारी, हिंदू धर्मनिष्ठचे अजित, पिंकू, एम्. पी. शर्मा, अधिवक्ता श्रीमती बंसल, अधिवक्ता सुदीप गुप्ता, अधिवक्ता श्याम किशोर, अधिवक्ता संतोष, अभिषेक कुमार; हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे अन् श्री. अमरजीत प्रसाद आदींनी सहभाग घेतला.
बोकारो जिल्ह्यामध्ये जिल्हा उपविकास आयुक्तांना निवेदन सादर
याच विषयावर बोकारो जिल्ह्यामध्ये जिल्हा उपविकास आयुक्त कीर्तीश्री यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसह धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्र
धनबादच्या आंदोलनासाठी तेथून १२६ किलोमीटर दूर असलेल्या हजारीबाग येथून धर्मप्रेमी सर्वश्री अजित सिंह, गौतम सिंह आणि श्री. पिंकू सहभागी झाले. या वेळी त्यांनी ‘अशा प्रकारचे आंदोलन आमच्याही भागात करावे’, असा मानस त्यांनी व्यक्त केला.