सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये लोकप्रतिनिधी यांना निवेदने !

हिंद जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !

सांगली, १६ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमे’च्या अंतर्गत ३२ शाळा, ६ महाविद्यालये, ४ लोकप्रतिनिधी, ८ पोलीस ठाण्यात, तसेच ६ ठिकाणी प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. सर्वच ठिकाणी समितीच्या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमाची आवश्यकता असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. ठिकठिकाणी फलकाद्वारेही जागृती करण्यात आली, तसेच शाळांमध्ये क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्सचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.

१. श्री. गणेश माळी यांचे घरी शिव रुद्रपूजेच्या वेळी उपस्थित असलेले ब्रह्मचारी निर्भयानंद स्वामीजी यांना निवेदन देण्यात आले.

ब्रह्मचारी निर्भयानंद स्वामिजी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सौ. अलका खवाटे (डावीकडे)

२. कुपवाड येथील सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये शाळेत सौ. रंजना शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. याचा लाभ ६५० विद्यार्थ्यांनी घेतला.

कुपवाड येथील सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये शाळेत सौ. रंजना शिंदे यांचे मार्गदर्शन ऐकतांना विद्यार्थी

३. धर्मप्रेमी कु. प्रेरणा देसाई यांनी पुढाकार घेऊन बोरगाव येथील शाळेत निवेदन दिले.

धर्मप्रेमी कु. प्रेरणा देसाई (उजवीकडून दुसर्‍या) बोरगाव येथील शाळेत शिक्षकांना निवेदन देतांना

४. जयसिंगपूर येथील ‘लठ्ठे एज्युकेशन सोसायटी’च्या बळवंतराव झेले हायस्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची माहिती देणारे ‘फ्लेक्स’चे प्रदर्शन लावण्यात आले होते. याचा लाभ ६ शिक्षक, तसेच ७ वी ते १० वी मधील २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. उपक्रम झाल्यावर ‘समितीचा उपक्रम अभिनंदनीय असल्या’चे प्रशिस्तपत्रक शाळेच्या वतीने देण्यात आले.

झेले हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांची माहिती देतांना राष्ट्रप्रेमी श्री. बाबूराव निकम
झेले हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांची माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

१. कु. समिक्षा माने – हा उपक्रम पुष्कळ आवडला, असे माहिती देणारे फ्लेक्स मी पहिल्यांदाच पाहिले.

२. कु. जान्हवी कदम – चाफेकर बंधूंविषयी पुष्कळ छान माहिती मिळाली.

३. कु. अपर्णा मगदूम – पुष्कळ चांगली माहिती मिळाली.