विधीमंडळाच्या सचिवांकडून शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ३९ आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील १४ अशा शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधीमंडळाच्या सचिवांकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदे गटाचे पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला होता. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभु यांनी त्यांचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला. या दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या विरोधात विधानसभेच्या अध्यक्षांकडे पक्षादेशाचा भंग केल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीवरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. भरत गोगावले यांनी केलेल्या तक्रारीतून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना नोटीस आलेली नाही.