अग्निहोत्रामुळे शेतीलासुद्धा लाभ !

अग्निहोत्र केल्यामुळे निर्माण होणारी स्पंदने आणि सात्त्विक धूर ते अवतीभोवतीच्या वस्तूमात्रांवर पसरतो, त्यांतील घातक ऊर्जांना निष्क्रिय करते. पोषक वातावरण बनते. तद्नंतर त्या वातावरणातील सेंद्रिय द्रव्ये जगणे, वाढ होणे आणि विस्तार यांसाठी पोषण करणाऱ्या शक्तींचा पुरवठा केला जातो. अशा रीतीने अग्निहोत्र प्रक्रिया वायूमंडलाची हानी प्रत्यक्षपणे भरून काढते. नियमितपणे शेतामध्ये अग्निहोत्र केल्यास त्याचा सर्व अंगांनी लाभ होतो. (संदर्भ : संकेतस्थळ sanatan.org)