‘कॉर्पाेरेट शेती’ निसर्गविरोधीच !

(कॉर्पोरेट शेतीमध्ये आस्थापनाला पीक विकले जाते. यात आधुनिक तंत्रज्ञान, तसेच शेतीचे तंत्र वापरणे ओघाने येते.)

‘कॉर्पोरेट शेती’

‘कॉर्पोरेट शेती’ करतांना संकरित (हायब्रीड) बी-बियाणांचा उपयोग होईल. या संकरित बियाणांमुळे शेतातील पिके जास्त येतील; पण त्या पिकांचा उपयोग पुन्हा बियांच्या रूपाने नवीन पिके काढण्यासाठी करू शकणार नाही. पुढील पिके काढण्यासाठी जे बी लागेल ते बनवण्यासाठी विदेशी तंत्रज्ञानावरच अवलंबून रहावे लागेल. एकाच शेतभूमीत जेव्हा वारंवार संकरित पिके काढली जातील, तेव्हा त्या भूमीचा कस अल्प होऊन ती नापीक होईल. काही वर्षांनंतर ‘कॉर्पोरेट शेती’ करणाऱ्यांना जेव्हा शेतभूमीची उत्पादनक्षमता अल्प झालेली लक्षात येईल, तेव्हा ते पूर्वी केलेला भाडेकरार रहित करतील. त्या वेळी शेतकऱ्यांची स्थिती कशी असेल ? बरीच वर्षे ‘कॉर्पोरेट शेती’ केल्यामुळे पुढील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे बी-बियाणे उपलब्ध नसेल. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना ‘कॉर्पोेरेट शेती’ करणाऱ्यांकडून जास्त भावाने बियाणे खरेदी करावे लागेल. बरीच वर्षे संकरित पिके घेतल्यामुळे भूमीची उत्पादनक्षमता न्यून झाल्याने पिकेही हलक्या प्रतीची येतील.

– एक साधक